Saturday, 7 July 2012

देवांग पुराण

समस्त देवांग कोष्टी समाजाला नमस्कार,

आपल्याला ऐकून फक्त १८ पुराणेच माहिती असतात. पण अनेक समाजांचे स्वतःची पुराणे असल्याचा शोध अलिकडेच हळू हळू उजेडात येऊ लागलेला आहे. मला खात्री आहे की देवांग कोष्टी समाजाच्या बहुसंख्यांना देवांग पुराण अस्तित्त्वात आहे हेच मुळी माहिती नसेल. काहींनी फक्त ऐकले असेल. तर काहींकडे असेलही, पण वाचलेले नसेल. तर देवांग कोष्टींपैकी काही ज्येष्ठांनी ते वाचलेले असेल. साळी समाजाच्या संकेतस्थळावर
'श्री भ. जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण' उपलब्ध आहेच. पण मायाजालावर शोध घेताना असे आढळून आले की देवांग कोष्टी समाजाचे स्वतःचे असे "देवांग पुराण" असूनही कुठेही ते उपलब्ध नाहिये या ब्लॉगच्या माध्यमातून हेच देवांग पुराण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर समस्त देवांग कोष्टी समाजाची कुलदेवता चौंडेश्वरी मातेला नमन करुन माझ्या या उपक्रमास सुरुवात करतो. आई चौंडेश्वरी माता मला या उपक्रमात यश देवो.



धन्यवाद,
आपला नम्र
सागर भंडारे